बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 10 ऑगस्ट 2016 (08:51 IST)

सलमानने दीपावरून घातला घोळ

salman khan
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ज्याला वाजतगाजत रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केले, तो सलमान खान जिम्नॅस्ट दीपा कर्माकारचे नाव तर विसरलाच, पण ती स्पर्धेतून बाद झाल्याचे ज्ञान पाजळून त्याने सगळ्यांनाच चक्रावून टाकले. त्यामुळे सलमानची सदिच्छा दूत म्हणून झालेली निवड पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
 
ऑलिम्पिकमध्ये कुणाही भारतीयाला न जमलेला पराक्रम दीपा कङ्र्काकारने केला आहे. रिओ ऑलिम्पिकमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात तिने अंतिम फेरीत धडक मारली आहे. 
 
या ऐतिहासिक कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. दीपावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पण, जिच्या नावाचा एवढा गवगवा होतोय, तिचे नाव ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत सलमान खान चक्क विसरला, तेव्हा सगळ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला. सोहेल खानच्या फ्रिकी अली या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सलमान उपस्थित होता.