शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: वॉशिंगटन , शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 (09:51 IST)

सेरेनाचा धक्कादायक पराभव, कॅरोलिना अंतिम फेरीत

serena willams
येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन टेनिसमध्ये महिलांच्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेली खेळाडू सेरेना विल्यम्स हिला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. कॅरोलिना प्लिस्कोवा हिने ६-२, ७-६ (५) असा पराभव केला. सलग दुसऱ्यावर्षी अमेरिकन ओपनमध्ये सेरेनाला पराभवाचा धक्का बसला आहे. अमेरिकन ओपन स्पर्धा जर सेरेनाला जिंकता आली असती तर तिचे हे २३ वे ग्रँड स्लॅम ठरले असते आणि तिने स्टेफी ग्राफचा विक्रम मागे टाकला असता. या पराभवानंतर सेरेनाला जागतिक क्रमवारीतील प्रथम क्रमांकाही मुकावा लागले आहे. जर्मनीची ॲजेंलिका क्रेबर आता प्रथम क्रमांकाची खेळाडू असेल.