गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (09:45 IST)

Asia Cup Hockey 2022: भारताचा जपानकडून 2-5 असा पराभव, स्पर्धेत टिकण्यासाठी पुढील सामना जिंकू किंवा मरू

hockey
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकीच्या पूल ए सामन्यात मंगळवारी जपानने भारताचा 5-2 असा पराभव केला. जीबीके एरिना येथे झालेल्या सामन्यात पहिल्या क्वार्टरपासून जपानने भारतावर वर्चस्व राखले. सामन्याच्या 23व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत नागयोशी केनने जपानसाठी पहिला गोल केला. सामन्याच्या 39व्या मिनिटाला कावाबे कोसेईने पुन्हा गोल करत जपानची स्कोअर 2-0 अशी नेली.
 
प्रत्युत्तरात भारताला दिलासा देत राजभर पवनने 44व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. चार मिनिटांनंतर, उका र्योमाने जपानसाठी दुसरा गोल करून स्कोअर 3-1 असा केला. सामन्याच्या 49व्या मिनिटाला सिंग उत्तमने भारतासाठी गोल करत स्कोअर 3-2 असा केला, मात्र त्यानंतरही सामना भारताच्या पकडाबाहेर जात राहिला. जपानच्या यामासाकी कोजीने 54व्या मिनिटाला आणि कावाबे कोसाईने 55व्या मिनिटाला गोल करून जपानची आघाडी 5-2 अशी वाढवली.
 
या पराभवामुळे भारत अ गटातील गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर तर जपान पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. हिरो आशिया कपमध्ये भारताने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. भारताचा पुढील सामना इंडोनेशियाशी आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.