Asian Games 2023: शुटींगमध्ये मराठमोळ्या ओजसला सुवर्णपदक
Asian Games 2023 ओजस आणि ज्योती जोडीने तिरंदाजीत कमाल केली, भारतासाठी सुवर्णपदक जिंकले
आशियाई क्रीडा 2023 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर बुधवारी (4 ऑक्टोबर) भारताने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे. कंपाउंड मिश्र सांघिक स्पर्धेत ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करत देशाला 71 वे पदक मिळवून दिले.
यापूर्वी, मंजू राणी आणि राम बाबू यांनी 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11 व्या दिवशी पहिले पदक जिंकले होते. या भारतीय जोडीने 35 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत देशासाठी कांस्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 71 पदके जिंकली आहेत. 16 सुवर्ण पदकांसह, यात 26 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे.