ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस सेरेना, सबालेंका चौथ्या फेरीत
दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शुक्रवारी 19 वर्षीय अनास्तासिया पोटापोव्हाला 7-6, 6-2 ने पराभूत करत चौथी फेरी गाठली आहे. ज्यावेळी सामना चालू होता त्यावेळी खेळाडू असलेल्या हॉटेलमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने व्हिक्टोरिया प्रदेश सरकारने शनिवारपासून लॉकडाउन लागू केल्याचे जाहीर केले. मात्र, पुढील पाच दिवस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये 25 चुका केल्यानंतरही आपल्याहून जवळ-जवळ 20 वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूवर वरचढ ठरलेल्या सेरेनाने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीबद्दल सांगितले की, ही चांगली गोष्ट नाही. प्रेक्षकांचे स्टेडियमध्ये झालेले पुनरागमन चांगले होते.
मात्र, कोणण्याही परिस्थितीत खेळाडूला चांगले खेळणे गरजेचे असते. जागतिक क्रमवारीत 101 व्या स्थानी असलेल्या खेळाडूविरुध्द सेरेनाने पहिल्या सेटच्या ट्रायब्रेकरमध्ये 5-3 ने पिछाडीनंतरही सलग चार गुण घेत सेट आपल्या नावे केला. सेरेनाचा पुढचा फेरीतील सामना बेलारूसच्या एरिना सबालेंकाशी होईल. तिनेही ग्रँडस्लॅमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ऑस्ट्रेयलिन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.
सबालेंकाने अमेरिकेच्या एन. ली हिला 6-3, 6-1 ने पराभूत केले. सबालेंका अव्वल 16 मध्ये सामील असलेली एकमेव अशी खेळाडू आहे जी एखाद्या ग्रँडस्लॅमच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचू शकली नाही. ती 2018 साली अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीतपर्यंत पोहोचली होती. तिसर्या6 फेरीत 14 व्या मानांकित गरबाईन मुगुरूजाने जरीना दियासचा 6-1, 6-1 ने पराभव केला. तर मार्केटा वोंड्राउसोवाने सोराना क्रिस्टीला 6-2, 6-4 ने पराभूत केले. पुरुषांच्या गटातील आठवा मानांकित डिएगो श्वार्टझॅन स्पर्धे तून बाहेर होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रूसच्या 114 व्या स्थानावरील अस्लान करातसेव्हने त्याला 6-3, 6-3, 6-3 ने पराभूत केले.