गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (10:24 IST)

मेरी कोम राज्यसभेतील अधिवेशनाला उपस्थित राहणार नाही

भारताची मुष्टियोध्दा मेरी कोम आंतरराष्ट्रीय स्पर्धा व टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी राज्यसभेत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाही. राज्सभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी वरिष्ठ सभागृहात याबाबतची घोषणा केली. नायडू यांनी सांगितले की, त्यांना मेरी कोमचे एक पत्र मिळाले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आपण सध्या सुरू असलेल्या सत्रात सदनातील बैठकांना उपस्थित राहू शकणार नाही.