मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (12:48 IST)

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविच व सेरेना यांचे विजय

जागतिक क्रमवारीत पहिल्यास्थानी विराजमान असलेल्या नोवाक जोकोविच आणि सेरेना विलियम्स यांनी सोमवारी ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस टुर्नामेंटमध्ये अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या एकेरी गटातून एकतर्फी विजय नोंदविला. 
 
जोकोविचनने जेरेमी चार्डीला सरळसेटमध्ये 6-3, 6-1, 6-2 ने तर सेरेनाने एक गेममध्ये पिछाडीवरून पुनरागमन करत पहिल्या दिवशी सलग 10 गेम जिंकत लॉरा सीजमुंडला 6-1, 6-1 ने पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. याशिवाय सिमोना हालेप व नाओमी ओसाका यांनीही आपल्या अभियानाची सुरूवात विजयाने केली.