गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (00:42 IST)

Badminton:थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटन फायनलमध्ये पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Badminton
गुरुवारी येथे झालेल्या थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटन फायनलमध्ये पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीत चीनविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला, तर महिलांच्या मोहिमेचा शेवट 0-3 असा झाला.गतविजेत्या भारताला विजेतेपद राखण्यात अपयश आले कारण पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीत चीनविरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला
 
दोन वर्षांपूर्वी थॉमस चषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाच्या एचएस प्रणॉयला 66 मिनिटांच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू शी यू क्यूईविरुद्ध 21-15, 11-21, 14-21 असा पराभव झाला. तर सात्विक -चिराग जोडीचा लियांग वेई केंग आणि वांग चँग जोडीकडून 15-21, 21-11, 12-21 असा पराभव पत्करावा लागला.

चीनला दुहेरी विजयामुळे 2-० अशी आघाडी मिळाली.22 वर्षीय सेनने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या ली शी फेंगचा 13-21, 21-8, 21-14 असा पराभव करत स्कोअर 1-2 असा केला, मात्र दुहेरीत ध्रुव आणि साई यांचा जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या रेन जियांग यू आणि भारताच्या हे जी टिंगकडून 10-21, 10-21 असा पराभव करून त्याच्या आशा संपुष्टात आल्या.

भारताच्या महिला संघातील अश्मिता चलिहा आणि इशाराणी बरुआ या जोडीला उबेरकप मध्ये जपानकडून 0 -3 असा पराभव झाला. दुहेरीत प्रिया आणि श्रुती मिश्राचा नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदाने  21-8, 21-9 असा पराभव केला 
 
 Edited By- Priya Dixit