शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (10:16 IST)

Badminton : सतीश कुमार करुणाकरन आणि आद्य वरियथ या मिश्र दुहेरीच्या जोडीने बॅडमिंटन विजेतेपद जिंकले

Badminton
सतीश कुमार करुणाकरन आणि आद्य वरियथ या मिश्र दुहेरीच्या जोडीने इराणमधील यजद येथे सहकारी भारतीय बी सुमीथ रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांचा पराभव करून '32 वे इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज' बॅडमिंटन विजेतेपद जिंकले.  
 
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात सतीश आणि आद्य जोडीने 22-20, 21-14 असा विजय मिळवला. के साई प्रतीक आणि कृष्ण प्रसाद गारागाने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या जॉब कॅस्टिलो आणि लुईस अरमांडो मोंटोया यांचा  21-18, 21-19 असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 
पुरुष एकेरीत मात्र सतीशला अंतिम फेरीत हाँगकाँगच्या गुयेन है डांगकडून 17-21, 18-21असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत चौथ्या मानांकित तसनीम मीरला हाँगकाँगच्या हसीन यान हॅप्पी लो हिच्याकडून 14-21, 12-21  असा पराभव पत्करावा लागला.
 
Edited By- Priya Dixit