गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (15:16 IST)

65 किलो फ्री स्टाइलमध्ये बजरंग पुनिया पुन्हा जगात नंबर 1 कुस्तीपटू

टोकियो ऑलिंपिकमधील भारतातील सर्वात मोठी पदकांची आशा असलेला बजरंग पुनिया 65 किलो फ्रीस्टाईल श्रेणीत परत एकदा नंबर वन कुस्ती करणारा बनला आहे. 
 
गेल्या वर्षी देखील बजरंग 65 की.ग्रा. फ्रीस्टाईल श्रेणीच्या क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचला होता, पण नंतर दुसर्‍या नंबरवर सरकला. 2018 मध्ये बजरंगने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकण्या व्यतिरिक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक देखील साध्य केले. 
 
हरियाणाच्या या कुस्तीपटूचे 58 गुण आहे आणि तो रशियाच्या 2 कुस्तीपटूंच्या पुढे आहे. दुसर्‍या क्रमांकावर 41 गुणांसह रशियाचा अख्मेद चेकोव आणि 32 अंकांसह नचिन क्युलर तिसर्‍या स्थानावर आहे. फ्री स्टाइल श्रेणीमध्ये भारताचा सुमित 125 किलो वजनाच्या सुपर हेवीवेट श्रेणीमध्ये 20 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. ग्रीको रोमन शैलीमध्ये भारतातील कोणताही कुस्तीपटू शीर्ष 10 मध्ये आपली जागा बनवू शकला नाही।  
 
महिला फ्रीस्टाईलामध्ये भारतातील 4 कुस्ती करणार्‍यांना त्यांच्या संबंधित वर्गाच्या शीर्ष 10 मध्ये जागा मिळाली आहे.. 50 किलो श्रेणीत 20 गुणांसह रितु 10व्या, वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेता पूजा ढांडा 57 किलो श्रेणीत 25 गुणांसह 6व्या, 59 किलो श्रेणीत 30 गुणांसह सरिता 4थ्या आणि 65 किलो श्रेणीत 20 गुणांसह रितु 8व्या स्थानावर आहे.