रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (09:54 IST)

26 मार्चपासून इंडिया ओपन, जगातील सर्वोत्तम खेळाडू होतील सहभागी

भारतातील सर्वात प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धा योनॅक्स सनराइझ इंडिया ओपनच्या नवव्या संस्करणाची सुरुवात 26 मार्च पासून होणार आहे. 350,000 डॉलरच्या या टूर्नामेंटची अंतिम फेरी 31 मार्च रोजी खेळण्यात येईल.    
 
गेल्या सात वर्षांपासून सिरी फोर्ट स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये आयोजित होणारी ही टूर्नामेंट या वेळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (आयजीआय) येथे आयोजित करण्यात येणार आहे. आयजीआय स्टेडियममध्ये 1982 मधील आशियाई खेळांचे आयोजन केले गेले होते. अलीकडे या स्टेडियममध्ये एआयबीए महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप देखील आयोजित केली गेली होती. योनॅक्स सनराइझ इंडिया ओपनाचे सर्व मॅच आयजीआय स्टेडियममध्ये केडी जाधव इंडोर हॉलमध्ये खेळले जातील. 
 
इंडियन बॅडमिंटन असोसिएशन (बीएआय) चे अध्यक्ष हेमंत बिस्वा सर्मा यांनी या टूर्नामेंटबद्दल म्हटले की, ही टूर्नामेंट नेहमीच भारतीय खेळाडूंसाठी जगभरातील सर्वोत्तम शटलरांविरुद्ध खेळण्यासाठी एक उत्कृष्ट मंच राहिला आहे. प्रत्येक वर्षी भारताने या स्पर्धेत एक विलक्षण प्रदर्शन दाखविले आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की यावर्षीही आमचे खेळाडू शानदार प्रदर्शन करतील. मी लोकांना मोठ्या संख्येने जुळण्याची आणि मॅच पाहण्यासाठी आग्रह करत आहो.  
 
या वर्षी होणार्‍या ऑलिंपिक क्वालीफायर्सच्या दृष्टीने अपेक्षित आहे की या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडू सहभागी होतील. या टूर्नामेंटमध्ये खेळाडू एक उत्कृष्ट प्रदर्शन करून 2020 टोकियो ऑलिंपिकसाठी थेट पात्रता मिळविणे इच्छुक राहतील.