5 गोल्ड जिंकणाऱ्या या अमेरिकन स्वीमरला हिंदू ग्रंथ वाचल्यावर मिळते मानसिक शांती
ओलंपिक खेळांमध्ये 5 गोल्ड जिंकणारी करिश्माई स्वीमर मिस्सी फ्रेंकलिनला हिंदू ग्रंथ वाचल्यावर मानसिक शांती मिळते. 23 वर्षाच्या या अमेरिकन स्वीमरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संन्यास घेण्याची घोषणा करून सर्वांना चकित केलं. खांद्याच्या वेदनेमुळे त्रस्त असलेल्या या स्वीमरने संन्यासानंतर मनोरंजनासाठी योगास सुरुवात केली पण हिंदू धर्माबद्दल जाणून घेतल्यानंतर ती अध्यात्माकडे वळली. ती जॉर्जिया विद्यापीठात धर्मावर अभ्यास करत आहे.
फ्रेंकलिनने सांगितले, "मी गेल्या एक वर्षापासून धर्म शिकत आहे. हे खूप आकर्षक आणि डोळे उघडणारा आहे. मला भिन्न संस्कृती, लोक आणि त्यांच्या धार्मिक विश्वासांबद्दल वाचन करणे आवडतं. लंडन ऑलिंपिकमध्ये चार स्वर्ण पदक जिंकणारी फ्रेंकलिन म्हणाली, "माझा स्वतःचा धर्म ख्रिश्चन आहे परंतु हिंदू आणि इस्लाम धर्मात मला अधिक रुची आहे. हे दोन्ही धर्म असे आहे ज्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती पण ते वाचल्यानंतर असे वाटले की ते आश्चर्यकारक आहे.
स्विमिंगमध्ये यशस्वी फ्रेंकलिन अभ्यासात देखील चांगली आहे आणि तिला हिंदू धर्माबद्दल भरपूर माहिती आहे. ती रामायण आणि महाभारताकडे आकर्षित आहे आणि यातील पात्रांशी अधिक जुळलेली नसली तरी दोन्ही महाग्रंथ वाचत आहे. ती म्हणाली, "मला त्यातले मिथक आणि कथा अविश्वसनीय वाटतात, त्यांच्या प्रभूबद्दल जाणून घेणे देखील विस्मयकारक आहे. महाभारत आणि रामायण वाचण्याचा अनुभव अलौकिक आहे. महाभारतात कुटुंबाच्या नावांमुळे गोंधळ होतो पण रामायणात राम आणि सीता यांच्याविषयी केलेले वाचन मला पाठ आहे.
चित्र सौजन्य : सोशल मीडिया