1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारली उडी

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 लोकांचा मृत्य झाला. यातून 25 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. बहुतांश लोकांचा मृत्यू जीव गुदमरल्यामुळे झाला. 
 
तरी आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी हॉटेलच्या खाली उडी मारली. यामध्ये एकाच मृत्यू झाला असून इतर लोकं जखमी झाले.
 
रिपोर्टनुसार, पहाटे साडे चारच्या सुमारास आग लागण्याची सूचना मिळाली. आग लागण्यामागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल प्रमुख यांच्यानुसार हॉटेलमधून 17 शव बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.