शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लोकसभा निवडणूक आघाडीमध्ये २० -२० जागा फोर्मुला तर वंचित बहुजन आघाडीसाठी ८ जागा

लोकसभा निवडणुका ज्या प्रकारे जवळ येत आहेत त्यानुसार सर्वच पक्ष कामाला लागले आहे. बलाढ्य भाजपाला कसे हरवायचे याचे नियोजन सुरु आहे. राज्यात तर ही लोकसभा निवडणुक ४८ जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा सुरु आहेत. ही चर्चा आता अंतिम टप्प्यावर आली असून, मागील आठवड्यापासून जागा वाटपावरुन भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासी असलेले संबंध जोरदार ताणले गेले होते. आता कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी ८  दिल्या असे प्राथमिक चित्र आहे.  त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी २०-२० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित होत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी आघाडीकडून १२ जागांची जोरदार मागणी केली. तर  ही महत्वाची  मागणी मान्य नाही झाली, तर भारिप सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवेल, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी आघाडीला  दिला होता. भारिपने जर खरोखरच सर्व जागांवर निवडणूक लढवली तर याचा सर्वात जास्त फटका आघाडीला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना बसणार आहे, . त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून भारिपसाठी चार-चार जागा सोडण्यात आल्या असून, मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी २१ जागांवर तर काँग्रेसने २७ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होतांना दिसून येते आहे. ही निवडणूक देशाच्या अनुषंगाने फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहे.