सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (09:33 IST)

सिद्धरामय्या यांचे एका महिलेसोबत गैरवर्तन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधींकडे केली आहे.म्हैसूरमधील ही संपूर्ण घटना उपस्थित मीडिया कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. 
 
जमीला नावाची संबंधित महिला म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. जमीला या सिद्धरामय्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आल्या होत्या. मात्र जमीला यांनी बोलण्यास सुरुवात करताच सिद्धरामय्या भडकले आणि त्यांनी महिलेच्या हातातून माईक काढून घेतला. माईक काढून घेताना महिलेच्या साडीचा पदरही खाली घसरला. तो त्या महिलेने तातडीने सावरला. मात्र जमीला आपल्या तक्रारीचा पाढा वाचताना, सिद्धरामय्यांनी तिच्या खांद्याला पकडून, ओरडून खाली बसवलं.