1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मदुराई , सोमवार, 28 जानेवारी 2019 (10:30 IST)

देशाच्या लुटारूंना सोडणार नाही : मोदी

देशातील बँकांचे पैसे बुडवून देशाचा विश्वासघात करून देशाबाहेर पळून जाणार्‍यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मदुराईमध्ये एका सभेला ते संबोधित करत होते.
 
देशाचा पैसा बुडवून पळून जाणार्‍या आर्थिक गुन्हेगारांवरही मोदींनी सडकूनटीका केली आहे. मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांचा स्पष्ट उल्लेख करत मोदी म्हणाले, देशाचा विश्वासघात करून पळून जाणार्‍यांना अजिबात सोडणार नाही. देशांचे पैसे लुटणार्‍यांना आम्ही निश्चित शिक्षा देऊ. आर्थिकदृष्ट्या मागासांना मिळणार्‍या आरक्षणाचा विरोध करणार्‍या डीएमकेवरही त्यांनी टीका केली आहे. वैयक्तिक फायद्यासाठी तमिळनाडूतील काही लोक अविश्वासाचे आणि संभ्राचे वातावरण तयार करत आहेत. केंद्राने दिलेल्या सवर्ण आरक्षणाविरोधात डीएमकेने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच यावेळी मोदींनी त्यांच्या सरकारने केलेल्या चांगल्या कामांचा पाढाही वाचला. स्वच्छतेच्या क्षेत्रात ग्रामीण भारतात अनेक काम झाली आहेत.