शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (08:11 IST)

क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, निवड चाचण्या कॅमेऱ्यासमोर होतील

sports equipment
राष्ट्रीय क्रीडा महासंघांकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या निवडीत पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात, सर्व निवड चाचण्या आता कॅमेऱ्यांसमोर घेतल्या जातील ज्यामध्ये क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहतील.खेळ मंत्रलयाच्या एका सूत्राने ही माहिती दिली.
अलिकडच्या काळात निवडीशी संबंधित मुद्दे न्यायालयात पोहोचल्यामुळे, गुणवत्तेवर आधारित निवड आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की- निवडीच्या बाबींवरून अनेकदा वाद होतात आणि ते कोर्टापर्यंत पोहोचतात, ज्याचा खेळाडूंवर परिणाम होतो. 
म्हणूनच, आतापासून आम्ही सर्व निवड चाचण्या कॅमेऱ्यांसमोर निरीक्षकांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड प्रक्रियेदरम्यान मंत्रालय आणि एसएआयचे अधिकारी उपस्थित राहतील.
 
राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि खेळाडूंमध्ये समन्वय वाढविण्यासाठी, दिल्लीतील विविध स्टेडियममध्ये कार्यालये उघडण्यासाठी महासंघांना जागा दिली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit