BWF World Championships 2021: किदाम्बी श्रीकांतने इतिहास रचला , लक्ष्य सेनला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केले
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने शनिवारी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने लक्ष्य सेनचा पराभव करत स्पेनमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. किदाम्बी श्रीकांत हा अंतिम फेरीत पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहे.
याआधी भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले होते. शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतने देशबांधव लक्ष्य सेनचा 17-21, 21-14, 21-17 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोघांमधील सामना सुमारे 69 मिनिटे चालला.
अंतिम फेरीतील किदाम्बी श्रीकांतचा सामना आता डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन आणि सिंगापूरचा केन येव लोह यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश करत देशासाठी दोन पदकांवर शिक्कामोर्तब केले. पराभवानंतर सेनला आता कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.