1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , मंगळवार, 8 जून 2021 (16:23 IST)

कोको गॉफ फ्रेंच ओपनच्या उपान्त्यपूर्व फेरीत

Coco Goff
अमेरिकेची किशोरवीयन खेळाडू कोको गॉफ हिने फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत ओन्स जेबोरचा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम टेनिस टुर्नामेंटच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
 
17 वर्षी गॉफने एकतर्फी झालेल्या लढतीत जेबोरचा 6-3, 6-1 ने पराभव केला. संपूर्ण सामन्यात अमेरिकन खेळाडूने आपल्या सर्व्हिसवर केवळ 9 गुण गमाविले. तिसर्या फेरीतही गॉफचा प्रवास सोपा ठरला होता. कारण ज्यावेळी तिने आपला पहिला सेट जिंकला होता.  त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडू जेनिफर ब्रेडीने डाव्या पायाला दुखापत झाल्याने सामना सोडून दिला होता. गॉफचा आता पुढील फेरीतील सामना बारबरा क्रेजसिकोव्हाशी होईल. क्रेजसिकोवानेही 2018 ची फ्रेंच ओपनची उपविजेता स्लोएन स्टिफन्सचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-0 ने पराभूत करत एखाद्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम आठमध्ये स्थान मिळविले आहे.