गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (14:00 IST)

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारला अपघात, 16.25 कोटींच्या कारचा चक्काचूर

फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची कार रस्ता अपघातात बळी पडली आहे. सोमवारी सकाळी रोनाल्डोचा एक अंगरक्षक ही कार घेऊन माजोर्काला जात होता. यादरम्यान अंगरक्षकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार भिंतीला जाऊन धडकली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात इतर कोणत्याही वाहनाचा समावेश नव्हता.
 
रोनाल्डोची कार ज्या घराला धडकली त्या घराच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून चालकाने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरनेही संपूर्ण अपघाताची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे.
 
याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचा उद्देश फक्त पोलिसांना अपघाताची माहिती देणे एवढाच होता, जेणेकरून गाडीच्या मालकाला विमा कंपनीकडून पैसे मिळू शकतील आणि विम्याच्या पैशांवरून कोणताही वाद झाल्यास पोलिस अहवाल साक्षीदार म्हणून वापरता येईल. मात्र, अपघाताच्या वेळी रोनाल्डोचा बॉडीगार्ड जो गाडी चालवत होता, त्याचे नाव काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही कार रोनाल्डोच्या नावावर रजिस्टर्ड आहे.