शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (15:04 IST)

Indonesia Open 2022: एचएस प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली, हाँगकाँगच्या खेळाडूला पराभूत केले

भारताचे स्टार शटलर एचएस प्रणॉयने इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या अनुभवी खेळाडूने उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या आंग का लाँग एंगसचा 21-11, 21-18 असा पराभव केला.
 
अँगसचे जागतिक क्रमवारीत12वे, तर प्रणॉय23व्या क्रमांकावर आहे. मात्र, या सामन्यात प्रणॉयने जबरदस्त खेळ दाखवला. पहिला गेम 21-11 असा एकतर्फी जिंकत प्रणॉयने वर्चस्व राखले. यानंतर दुसऱ्या गेममध्ये अँगसने पुनरागमन करत प्रणॉयशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भारतीय खेळाडूच्या पुढे जाऊ शकला नाही. प्रणॉयने दुसरा गेम 21-18 असा जिंकला. 29 वर्षीय प्रणॉयने पहिल्या फेरीत 20 वर्षीय लक्ष्य सेनचा पराभव केला होता.