शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (13:31 IST)

दीपिका कुमारी 9व्या स्थानावर

पहिल्या दिवशी धनुर्विद्या आणि बॉक्सिंगमध्ये भारत आपला जलवा दाखवणार आहे. धनुर्विद्यामध्ये रँकिंकमध्ये दीपिका कुमारीने दीपिका कुमारीने 9 वं स्थान पटकावलं आहे.
 
महिला तिरंदाजी रँकिंग स्पर्धेत दीपिका कुमारीची कामगिरी काही वेगवान ठरली नव्हती. तिने 663 गुणांसह नववे स्थान मिळविले. दक्षिण कोरियाचे तिरंदाज क्रमवारीत पहिल्या तीन स्थानांवर होते. कोरियाचा आन सान 680 गुणांसह प्रथम, जंग मिन्ही (677) द्वितीय आणि कांग झी (675) तिसर्‍या स्थानी आला.
 
ऑलिम्पिकच्या काही आठवड्यांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या विश्वचषकात दीपिकाने तीन सुवर्ण पदके जिंकली. त्यामुळे त्याच्याकडून बरीच आशा होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळविला. प्री-क्वार्टर फायनलमध्ये दीपिका 54 व्या स्थानावर असलेल्या भूटानीज तिरंदाज कर्माशी भिडणार आहे.