बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (12:30 IST)

शूटिंग वर्ल्ड कप : भारताने पाकिस्तानी शूटर्सचा व्हिसा अडकवला

नवी दिल्लीत होणार्‍या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भाग घेऊ शकणार नाही. पाकिस्तानच्या 'राष्ट्रीय रायफल शूटिंग फेडरेशन' च्या सर्वोच्च अधिकार्‍याने मंगळवारी पुष्टी केली की त्यांच्या शूटर्सला भारतीय उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त झाला नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये सहभागी पाकिस्तानी शूटर्सवर शंका व्यक्त केली जात आहे. एनएसआरएफचे अध्यक्ष रजी अहमद म्हणाले, 'बुधवारी सकाळी आमच्या शूटर्रांना निघायचं होत कारण वर्ल्ड कप गुरुवारपासून सुरू होत आहे परंतु आम्हाला व्हिसा मिळाला नाही.' 
 
भारत सरकारकडून व्हिसा प्राप्त झाला नाही - ते म्हणाले, 'पुलवामा घटनेनंतर व्हिसा मिळविण्याबद्दल आम्हाला शंका होतीच आणि ते आज खरे सिद्ध झाले. ही आमच्यासाठी फार वाईट बातमी आहे की आमच्या शूटर्सला ओलंपिकसाठी क्वालिफाई करण्याची संधी मिळणार नाही.' रजी म्हणाले की एअर तिकिट बुक झालेले होते आणि दिल्लीमध्ये शस्त्र घेऊन जाण्यासाठी कोणतेही आक्षेप प्रमाणपत्र नाही असे देखील मिळाले होते. त्यांनी सांगितले की पाकिस्तानने जी एम बशीर आणि खलील अहमदसह टीम मॅनेजरसाठी व्हिसा मागितला होता. या दरम्यान 'इंडियन नॅशनल रायफल असोसिएशन' ने सांगितले की वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी शूटर्सच्या सहभागाविषयी त्यांना कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.