शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

फिफाच्या क्रमवारीत भारत 100 व्या स्थानी

जागतिक फुटबॉल महासंघाने  जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये तब्बल 21 वर्षांनंतर भारतीय संघाने  100 वं स्थान मिळवलं. भारतासोबत निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत. तर आशियाई क्रमवारीत भारतानं आपलं अकरावं स्थान कायम राखलं आहे.

स्वातंत्र्यानंतर फिफाच्या क्रमवारीत पहिल्या शंभर संघांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची ही केवळ सहावी वेळ आहे.  फिफा क्रमवारीतली भारताची सर्वोत्तम कामगिरी 94 व्या स्थानाची आहे. फेब्रुवारी 1996 मध्ये फिफा क्रमवारीत भारताने 94 वं स्थान गाठलं होतं. याचवर्षी एप्रिल महिन्यात भारताची 100 व्या स्थानावर घसरण झाली होती. त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी भारतीय संघ पुन्हा शंभराव्या स्थानावर दाखल झाला आहे.