फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदाल, जोकोविचने पुढची फेरी गाठली

पॅरिस| Last Modified शुक्रवार, 2 जून 2017 (13:34 IST)
राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसर्‍या फेरीत धडक मारली. तर, महिला गटातील गतविजेत्या गार्बिनी मुगुर्झाला विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. झेकची 20 वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हाचे आव्हानही दुसर्‍या फेरीत संपुष्टात आले. फ्रान्सच्या बिगरमानांकित एलिन्झ कॉर्नटने 6-1, 6-4 असे नमवले.

आपले दहावे फ्रेंच ओपन जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने रॉबिन हासेला एक तास व 49 मिनिटे चाललेल्या सामन्यामध्ये 6-1, 6-4, 6-3 अशा फरकाने
नमवले. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये नदालला रॉबिनने चांगली टक्‍कर दिली; पण नदालने आपला खेळ उंचावत सेट आपल्या नावे केला. यानंतर तिसर्‍या सेटमध्येदेखील नदालने आपला हाच फॉर्म कायम ठेवत विजय निश्‍चित केला. सामन्यात केलेल्या कामगिरीने मी अत्यंत आनंदी आहे. सरळ सेटमध्ये विजय मिळवणे हे नेहमीच आनंददायी असते. या सामन्यात मी बर्‍याच गोष्टी योग्य केल्या असे मला वाटते, असे नदाल सामना संपल्यानंतर म्हणाला.
अन्य लढतीत गतविजेत्या नोवाक जोकोविचने पोर्तुगालच्या जोआओ सौसाला 6-1,6-4, 6-3 असे पराभूत करत केले. दुसर्‍या मानांकित जोकोविचचा सामना पुढच्या फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगोशी होणार आहे. सामन्यातील पहिले दोन सेट मी चांगले खेळलो पण, तिसरा सेट मला कठीण वाटला. असे जोकोविच म्हणाला. सहाव्या मानांकित डॉमिनिक थीमने सिमोन बोलेलीला 7-5, 6-1, 6-3 असे नमवित पुढची फेरी गाठली.
यासोबतच ग्रिगोर दिमित्रोव व डेविड गॉफिन यांनीदेखील पुढच्या फेरीतील स्थान निश्‍चित केले.
महिलांच्या एकेरीमध्ये गतविजेत्या असलेल्या मुगुर्झाने पहिला सेट गमावल्यानंतर अ‍ॅनेट कोंटावेटवर
6-7 (4/7), 6-4, 6-2 असे नमविले. सेरेना विल्यम्सची मोठी बहीण आणि दहावी मानांकित व्हीनस विल्यम्सनेही तिसर्‍या फेरीत प्रवेश करतांना जपानच्या नाराचा 6-3 आणि 6-1 असा फडशा पाडला. फ्रान्सची ख्रिस्तीयाना मॅल्डोन्विक, अमेरिकेची बेथानी मॅटेक सॅन्ड यांनीही दुसर्‍या फेरीत सहज विजय साजरे केले.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा ...

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी  : सुप्रीम कोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ
लॉकडाऊनमुळे सोन्या-चांदीची दुकाने बंद असली तरी सोन्या-चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ ...