शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2017 (11:29 IST)

गौरव बिदुरी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी पात्र

जर्मनीतील हुम्बर्ग येथे 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱया विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी भारताचा मुष्टीयोद्धा गौरव बिदुरी पात्र ठरला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारताचे आतापर्यंत आठ मुष्टीयोद्धे पात्र ठरले आहेत.
 
56 किलो वजन गटात बिदुरीला जर्मनीतील स्पर्धेसाठी परवानगी देण्यात आली आहे. ताश्कंद येथे झालेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भूतानच्या गौरव बिदुरीला पात्र फेरीसाठीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नव्हते. जर्मनीमधील या स्पर्धेसाठी भारताचे अमीत फेंगल, कविंदर सिंग, शिवा थापा, मनोजकुमार, विकास कृष्णन, सुमीत सागवान, सतीशकुमार आणि गौरव बिदुरी सहभागी होणार आहेत.