बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (17:10 IST)

सुवर्ण पदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने केली आत्महत्या

अकोल्यामध्ये सुवर्ण पदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत (२२)याने आत्महत्या केली आहे.  शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास  घेतला. जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने सुवर्णपदक पटकावलं होतं. आत्महत्येविषयी माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रणवच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  
 
प्रणव सकाळी क्रीडा प्रबोधनीत आला होता. बराच वेळ तो खोलीतून बाहेर न आल्यामुळे मित्रांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद असल्यामुळे अखेर प्रणवच्या मित्रांनी दार तोडलं. त्यावेळी प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.