शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

साईना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साईना नेहवालने गुरुवारी युक्रेनच्या मारिया युलिटिनाचा सरळ गेममध्ये पराभव करीत बर्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. 
 
कारकीर्दीतील चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र होण्यासाठी धडपणार्‍या साईनाने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत मारियाचा 21-10, 21-19 असा पराभव करत विजय नोंदविला. आता उपांत्यपूर्व फेरीत साईनासमोर थायलंडच्या तिसर्‍या मानांकित बुसानन ओंगबामरूंगफान हिचे आव्हान असणार आहे. बुसान हिच्याकडून मागील दोन लढतींमध्ये साईनाला पराभव पत्करावा लागला आहे. 
 
दरम्यान, पाचव्या मानांकित साईनाने पहिल्या फेरीत जर्मनीच्या व्होनी लीवर हिचरा 21-16, 21-14 असा पराभव करत आगेकूच केली होती.