मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (17:05 IST)

भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनच्या नवीन फॉर्मेट एअरबॅडमिंटनला केलं सपोर्ट

सायना नेहवालसह भारताच्या शीर्ष शटलर्सने बॅडमिंटनच्या नवीन फॉर्मेट एअरबॅडमिंटनचे समर्थन केलं. त्यांच्या मते यात संन्यास घेतलेल्या माजी खेळाडूंना पर्यायी करिअर प्रदान करण्याची क्षमता आहे. 
 
आउटडोअर बॅडमिंटन मनोरंजनासाठी भारताचा आवडता खेळ आहे आणि देशात अशा ठिकाणी देखील आहेत जेथे पैशांची कमाई करण्यासाठी पर्याय देखील आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) ने गेल्या आठवड्यात ग्वांगझू येथे एअरबॅडमिंटनला जागतिक पातळीवर सुरू केले आहे. यात कोर्टाची लांबी आणि रुंदी वेगळी असेल आणि यात एक नवीन प्रकाराची शटलकॉक वापरली जाईल ज्यास एअरशटल म्हणतात. एअरशटलवर वायूचा फार कमी परिणाम होईल. आर्द्रतेचा देखील यावर फारसा प्रभाव पडणार नाही.
 
ओलंपिक कांस्य पदक विजेता आणि माजी वर्ल्ड नंबर एक खेळाडू सायना म्हणाली की एअरबॅडमिंटनने या खेळाला पुढे प्रोत्साहन देण्यात मदत करेल आणि हे जगातील विविध ठिकाणी पसरेल. सायनाने सांगितले, "भारतात, आपल्यापैकी बहुतेक लोक हा खेळ बाह्य खेळांच्या रूपात खेळतात. आम्ही ते आपल्या पालक किंवा मित्रांबरोबर आपल्या घराबाहेर खेळतो. बीडब्ल्यूएफचा याला प्रोत्साहन देण्याचे हे पाऊल उत्तम आहे." 
 
एचएस प्रणयच्या मते एअरबॅडमिंटन, संन्यास घेतलेल्या माजी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंना वैकल्पिक करिअर प्रदान करेल. प्रणय म्हणाला, "इंडोर बॅडमिंटन शारीरिक रित्याने बरेच आव्हानात्मक आहे, त्यामुळे संन्यास घेतल्यानंतरही खेळाडू एअरबॅडमिंटन खेळत राहू शकतात आणि त्याला वैकल्पिक करिअर बनवू शकतात. आउटडोर बॅडमिंटनमध्ये भरपूर पैसा आहेत. विशेषत: केरळमध्ये मी पाहिले आहे की खेळाडू विविध ठिकाणी जातात आणि प्रत्येक रात्री खेळून चांगले पैसे कमावतं आहेत. म्हणून हे एक चांगले प्रयत्न आहे."