मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (18:31 IST)

सायना नेहवालला गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला गॅस्ट्रोएन्टेरायटिस हा आजार झाला आहे. तिने स्वत:ने या आजाराबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे. सायनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
या त्रासामुळेच तिने एक महत्वाची स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आणि भारतात परतली.
 
तिने लिहिले की ‘एक वाईट बातमी आहे. गेल्या सोमवारपासून माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, पण तरीदेखील मी ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धेतील काही सामने खेळून काढले. आता मात्र मला या वेदना अजिबातच सहन होत नाहीत. त्यामुळे मी आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. मी लवकर या आजारातून ठणठणीत होईन आणि बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करेन’.