शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (20:01 IST)

गोल्डन बॉय नीरज चोप्राची तब्येत बिघडली, त्याला रुग्णालयात नेण्यात आले

Golden Boy Neeraj Chopra's health deteriorated
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.टोकियो ऑलम्पिक मध्ये भालाफेक मध्ये सुवर्णपदक पटकावल्यावर भारतात आल्यावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्याची मिरवणूक काढण्यात आली.आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.परंतु कार्यक्रमाच्या स्थळी त्याची तब्बेत अचानक बिघडली.त्याला ताप आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली.त्याचा कोरोनाचा अहवाल नकारात्मक आला आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नीरज चोप्रा यांना 103 ताप आहे.यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे.त्यांच्या साठी पानिपत मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना अस्वस्थ जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती बरी असल्याचे समजले आहे.