Archery : भारताच्या मुलींनी जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं
जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले असून शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी १८ वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाच्या अंतिम सामन्यात २२८-२१६ ने तुर्कीला हरवले. ही स्पर्धा पोलंड येथे सुरु आहे.
भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या या संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली होती. परनीत कौर, प्रियागुर्जर व रिधु सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत २१६० पैकी २०६७ गुणांची कमाई करत विश्वविक्रम नोंदवला होता. आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघानं २२ गुण अधिक कमावले होते.