रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 1 मार्च 2018 (12:14 IST)

हॉकी विश्वचषकासाठी भारत सोप्या गटात

नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे खेळवण्यात येणार्‍या हॉकी विश्वचषकासाठी भारताचा तुलनेने सोप्या गटात समावेश करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. भारताचा समावेश 'क' गटात करण्यात आला असून भारताला फक्त  बेल्जियय या एकमेव तगड्या प्रतिस्पर्धी संघाचा सामना करावा लागणार आहे. 
 
16 डिसेंबर रोजी हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
 
बेल्जियमव्यतिरिक्त भारताच्या गटात कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र खडतर आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. ड गटात पाकिस्तानसोर नेदरलँड, जर्मनी आणि मलेशियाचे आव्हान असणार आहे.
 
2018 हॉकी विश्वचषकासाठी 
 
जाहीर करण्यात आलेली गटवारी 
 
अ गट : अर्जेंटिना,न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स  
ब गट : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन
क गट : बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका  
ड गट : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान
 
विश्वचषकातील भारतीय 
सामन्यांचे वेळापत्रक
 
1) भारत × दक्षिण आफ्रिका : 28 नोव्हेंबर
2) भारत × बेल्जियम : 2 डिसेंबर
3) भारत × कॅनडा : 8 डिसेंबर