बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

भारताची अर्थव्यवस्था 2018मध्ये 7.6 टक्के दराने वाढेल : 'मूडीज'

'मूडीज' या आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थेने भारताची अर्थव्यवस्था 2018मध्ये 7.6 टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन गोष्टींमुळे बसलेल्या धक्क्यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असल्याचे व स्थिती सुधारत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्यामुळे नोटाबंदी व जीएसटीचा फटका बसूनही अर्थव्यवस्था आधीच्या अंदाजाप्रमाणे यावर्षी 7.6 टक्के दराने वाढेल असा विश्वास मूडीजने व्यक्त केला आहे.
 
नोटाबंदीमुळे विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळ बसली होती. तसेच गेल्या वर्षी जुलैपासून जीएसटीची अमलबजावणी करण्यात आली जिच्यामुळेही अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात हादरे बसले. या सगळ्यामधून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल आधी व्यक्त केलेला अंदाज कायम ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.