1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (10:55 IST)

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया कडून दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा 3-2 असा पराभव

hockey
भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी टाटम स्वर्टने 12व्या आणि 45व्या मिनिटाला, तर पिप्पा मॉर्गनने 38व्या मिनिटाला गोल केला. 
 
भारताकडून संगीता कुमारीने 13 व्या मिनिटाला आणि गुरजीत कौर ने 17 व्या मिनिटाला गोल केले.आठव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने पहिला सामना 2-4 असा गमावला होता. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी होणार आहे. यावर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया अ संघासोबतही सामने खेळणार आहे.
 
Edited by - Priya Dixit