बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

जीवन नेदुंचेझियनचे स्वप्न साकार

नशिबाचे फेरे सतत माणसाची कसोटी पाहत असतात, असाच अनुभव भारताच्या जीवन नेदुंचेझियनलाही आला. सहकार्‍याच्या दुखापतीमुळे विम्बल्डन टॅनिस स्पर्धेतील सहभागाचे स्वप्न दुरापास्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र अमेरिकन खेळाडू जेरिड डोनाल्डसनने दिलेल्या होकारामुळे त्याचे विम्बल्डन खेळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
 
जीवन हा विम्बल्डनच्या दुहेरीत हियोन चुंग याच्या साथीत खेळणार होता. या स्पर्धेद्वारे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली होती.