भारताचा लक्ष्य सेन दुसऱ्यांदा हायलो ओपनचे विजेतेपद पटकावून चॅम्पियन बनला
लक्ष्य सेनने हायलो ओपनच्या अंतिम सामन्यात जोनाथन क्रिस्टीचा २१-१७, २१-१० असा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील सातवे विजेतेपद पटकावले. या हंगामातील हे त्याचे पहिले विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०२१ मध्ये हायलो ओपन जिंकले होते.
जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने हायलो ओपनच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या सामन्यात त्याने क्रिस्टीला २१-१७, २१-१० असे हरवले. हे लक्ष्यच्या कारकिर्दीतील सातवे विजेतेपद आहे. इतकेच नाही, तर हे लक्ष्यचे दुसरे हायलो ओपन विजेतेपद असून, असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
लक्ष ने उपांत्य फेरीत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हायलो ओपनमधील हे त्याचे दुसरे विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी २०२१ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. लक्ष्यने गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले मागील विजेतेपद पटकावले होते. या विजयामुळे त्याने विजेतेपदासाठीची आपली प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. यापूर्वी, पीव्ही सिंधूनेही हाय-लो ओपन जिंकून एक उल्लेखनीय कामगिरी केली होती.

