गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (12:14 IST)

सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज, खेळाडूचा मृत्यू

फ़ुटबाँल सामना दरम्यान एका खेळाडूवर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इंडोनेशियातील एका सामना दरम्यान घडला आहे. खेळाडूचा रुग्णालयात नेतानाच दुर्देवी मृत्यू झाला. 
इंडोनेशियातील एफसी बांडुंग आणि एफबीआय शुबांग यांच्यात सामना शनिवारी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सिलिवांगी स्टेडियमवर खेळला गेला .या वेळी सामना खेळणाऱ्या खेळाडूवर वीज कोसळली.

या अपघाताचा व्हिडीओ सोशल इंडियावर व्हायरल होत आहे. हा सामना खराब हवामानात खेळला जात होता.  
दरम्यान, मैदानाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या खेळाडूवर अचानक वीज पडली. व्हिडीओमध्ये विजांच्या कडकडाटादरम्यान भीषण आग बाहेर पडताना दिसत आहे. वीज खेळाडूवर कोसळली होती.  विजेचा धक्का लागतातच खेळाडू खाली कोसळला.

विजेचा धक्का एवढा जोरदार होता की जवळ उभा असलेला एका अजून खेळाडूला धक्का लागला. तो काही वेळाने उठून उभा राहतो. बाकीचे खेळाडू स्वत:चा बचाव करण्यासाठी जमिनीवर झोपले, तर काही बाहेर पळू लागले.
 
पण ज्या खेळाडूवर वीज पडते तो तसाच पडून राहतो. इतर खेळाडू आणि वैद्यकीय पथक त्याची काळजी घेण्यासाठी धावत येतात त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जातात. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू होतो. रुग्णालयातील डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. . 

 Edited by - Priya Dixit