रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (09:57 IST)

लिओनेल मेस्सी यापुढे बार्सिलोनासोबत खेळणार नाही

फुटबॉलचा सुपरस्टार खेळाडू अर्जेंटिनाचा बार्सिलोनाशी असलेला जुना संबंध आता संपला आहे. एफसी बार्सिलोनाने स्वतः याबद्दल माहिती देताना सांगितले की, मेस्सी यापुढे क्लबसोबत खेळणार नाही. 
 
स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोनाच्या वेबसाईटनुसार, क्लब आणि लिओनेल मेस्सीचा स्पष्ट करार असूनही करार होऊ शकला नाही आणि दोन्ही पक्षांमध्ये नवीन करार होण्या बाबत  आर्थिक आणि संरचनात्मक अडचणींमुळे (स्पॅनिश लीगा नियम) करार होऊ शकला नाही. 
 
क्लबच्या मते, या परिस्थितीचा परिणाम म्हणून, मेस्सी यापुढे एफसी बार्सिलोनामध्ये राहणार नाही. दोन्ही बाजूंनी खेद व्यक्त केला की खेळाडू आणि क्लबच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत.