गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (15:15 IST)

शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने घेतला आहे. 30 जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य कुस्तीगिर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असं सांगत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्याचं कुस्तीगीर महासंघाने म्हटले आहे. 
 
विशेष म्हणजे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत. दरम्यान या कारवाईला महारष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. बाळासाहेब लांडगे अगदी अध्यक्षांचा सुद्धा आदेश जुमानत नव्हते, असा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे.