रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (12:26 IST)

मराठमोळ मानसी जोशीची बार्बी डॉल लॉन्च

Photo : Twitter
भारतीय पॅरा बॅडटिंनपटू मानसी जोशी हिची बार्बी डॉल (बाहुली) लॉन्च झाली आहे. याआधी जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर हिची बार्बी डॉल बनवली होती. यानंतर पॅरा बॅडटिंनपटू मानसी जोशीने बार्बीला धन्यवाद दिले आहेत. मानसी जोशीने स्वतः आपल्या टि्वटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे.
 
याबाबत मानसीने टि्वटरवर एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत मानसीने एक कॅप्शन लिहिली आहे की, धन्यवाद बार्बी. माझ्याजवळ सध्या माझ्यासारखी दिसणारी एक सुंदर अशी बाहुली आहे हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. माझा विश्वास आहे की, समावेश आणि विविधता यांचे शिक्षण लवकर सुरू झाले पाहिजे आणि माझी आशा आहे की, माझी कहाणी तरुण मुला-मुलींना प्रेरणादायक ठरेल. माझे जीवन त्यांच्यात उत्साह निर्माण करेल. यामुळे त्यांचे करिअर उंचावेल.