सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:20 IST)

मराठमोळा तांबे आयपीएलमध्ये

वयाच्या 48 व्या वर्षातली एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशी ऊर्जा घेऊन मैदानात उतरणार्याठ प्रवीण तांबेला यंदाच्या आयपीएल हंगामात संधी मिळाली आहे. आयपीएल 2020 साठी कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांच्या बोलीवर प्रवीणला आपल्या संघात घेतले होते. परंतु प्रवीणने कॅरेबिअन प्रीमिअर   लिग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे यंदाची आयपीएल खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला. 
 
बीसीसीआयच्यानियमानुसार भारती क्रिकेट बोर्डाशी संलग्न असलेला खेळाडू बाहेरील देशांतील लिगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. प्रवीण तांबेने नेमका हाच निर्णय मोडल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
 
कॅरेबिअन प्रीमिअर लिग स्पर्धेत खेळत असताना त्रिंबागो नाईट राडर्स संघाकडून प्रवीणने बहारदार कामगिरी केली. यानंतर चाहत्यांच्या भावनेचा आदर करत कोलकाता नाईट राडर्स संघाने तांबेला संघाच्या प्रशिक्षण वर्गात काम करण्याची संधी दिली आहे. प्रवीण आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी फिरकीपटूंना मार्गदर्शन करणार आहे.
 
आयपीएल स्पर्धेत प्रवीणला यंदा फार कमी संधी मिळाल्या. परंतु आपल्याला मिळालेल्या प्रत्येक सामन्यात प्रवीणने स्वतःची छाप पाडली. तसेच मैदानात सरावादरम्यान, खेळाडूंना मार्गदर्शन करताना, मदत करण्यात प्रवीण नेहमी तत्पर असतो. यूएईमधील खेळपट्‌ट्यांवर त्याच्या अनुभवाचा संघातील फिरकीपटूंना फायदा होईल असे मत मैसूर यांनी व्यक्त केले. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.