शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:49 IST)

राष्ट्रीय ग्रामीण ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन

national gramin olympic competition
भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक संघ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून स्पर्धा नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा  करण्यात आली आहे. येत्या ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान सदर स्पर्धा होणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. यासाठी ११ राज्यांतील मुला-मुलींचे संघ नाशकात येणार आहेत. याप्रसंगी उपस्थितांना क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.