नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये शानदार कामगिरी करत पहिले स्थान पटकावले  
					
										
                                       
                  
                  				  नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये 88.16 चा थ्रो करून तिरंगा झेंडा उंचावला आहे. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 88.16 मीटरचा थ्रो फेकला, जो पॅरिस डायमंड लीग 2025 मधील त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला.
				  													
						
																							
									  				  				  
	 त्यानंतर, त्याने दुसऱ्या प्रयत्नात 85.10 मीटरचा थ्रो फेकला. त्यानंतर त्याचे पुढील तीन थ्रो फाऊल ठरले. सहाव्या थ्रोमध्ये त्याने 82.89 मीटर अंतरावर भाला फेकला. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  				  																								
											
									  
	ज्युलियन वेबर तेवढ्या अंतरावर भाला फेकू शकला नाही. पॅरिस डायमंड लीग 2025 मधील त्याचा सर्वोत्तम थ्रो 85.10 होता. म्हणूनच त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण वेबरचा एकही थ्रो फाऊल झाला नाही. तिसरे स्थान ब्राझीलच्या लुईझ मॉरिसियो दा सिल्वाने मिळवले. त्याने 86.62 मीटरचा थ्रो फेकला
				  																	
									  
	Edited By - Priya Dixit