सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 7 ऑगस्ट 2022 (16:25 IST)

PKL 2022 Auction: पवन शेरावत प्रो कबड्डी लीगचा सर्वात महागडा खेळाडू

photo- social mediaप्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. पहिल्या दिवशी तामिळ थलायवासच्या टीमने रेडर पवन शेहरावतला 2.26 कोटींना खरेदी केले. यासह पवन प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लीगमध्ये दोन कोटींहून अधिक रुपयांना विकला जाणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर गुमान सिंग हा बी श्रेणीतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 1.21 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. यावेळी चार खेळाडूंना एक कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे, पवन शेरावत आणि गुमान सिंग यांच्याशिवाय विकास कंडोला आणि फजल अत्राचली यांना यावर्षी एक कोटींहून अधिक रुपये मिळाले आहेत.