शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (16:56 IST)

प्रमोद भगत-पलक कोहली पॅरालिम्पिक बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी सामन्यात पराभूत झाले

प्रमोद कुमार आणि पलक कोहली या भारतीय मिश्र दुहेरी जोडीला पॅरालिम्पिकच्या कांस्य पदक प्लेऑफ सामन्यात रविवारी जपानच्या दाइसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो जोडीकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय जोडीला  SL3-SU5 वर्गाच्या कांस्य पदकप्लेऑफमध्ये 37 मिनिटांत जपानी जोडीने  21-23 19-21 ने पराभूत केले आणि चौथ्या स्थानावर त्यांची मोहीम संपवली.त्याआधी, उपांत्य फेरीत त्यांना हॅरीसुसांतो आणि लिएनी रात्री ओक्टिला या इंडोनेशियन जोडीकडून 3-21 15-21 ने पराभूत व्हावे लागले.
 
दोन्ही जोड्या संपूर्ण सामन्यात बरोबरीने स्पर्धा देत होत्या. भारतीय जोडी पहिल्या गेममध्ये 10-8 ने आघाडीवर होती,पण जपानी जोडी परत 10-10 अशी परतली. यानंतर स्कोअरलाइन 14-14, 18-18 आणि नंतर 20-20 होती. भारतीय जोडी 21-20 ने पुढे गेली,पण नंतर पहिला गेम 21-23 ने गमावला. दुसऱ्या गेममध्येही दोन्ही जोड्या 10-10 ने बरोबरीवर होत्या .जपानी जोडीने 21-19 जिंकून कांस्यपदक पटकावले.
 
तेहतीस वर्षीय भगतने शनिवारी पॅरालिम्पिक पुरुष एकेरी एसएल 3 वर्गात भारताला पहिले बॅडमिंटन सुवर्णपदक जिंकून दिले. 19वर्षीय कोहलीचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे.