गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: इंडियन वेल्स , सोमवार, 20 मार्च 2017 (10:58 IST)

फेडरर-वॉवरिंकामध्ये झुंज

roger federer
स्वित्झर्लंडचे रॉजर फेडरर आणि स्टेन वॉवरिंका यांच्यात इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंज पाहावयास मिळेल. ऑस्ट्रेलिया खुली स्पर्धा नावावर करून १८वे ग्रँडस्लॅम पटकावणार्‍या फेडररने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेचा जॅक सोकचा ६-१ आणि ७-६ असा पराभव केला. तर, वॉवरिंकाने स्पेनचा पाब्लो कोरेनचा ६-३ आणि ६-२ असा सहज पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.