सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 20 एप्रिल 2017 (12:17 IST)

सेरेना विलियम्स प्रेग्नेंट, स्विम सूटमध्ये फोटो पोस्ट करून लिलिहे - 20 आठवडे

serena williams is pregnant
टेनिस स्टार सेरेना विलियम्स (35) आई बनणार आहे. ही बातमी तिनी स्वत: दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून लिहिले - '20 आठवडे'. या फोटोत तिने यलो कलरचे स्विम सूट परिधान केले आहे. ही बातमी मिडियात आल्याबरोबर लोकांनी तिचे सोशल मीडियावर अभिनंदन करणे सुरू केले. द वूमन टेनिस एसोसिएशनने देखील ट्विटकरून  बधाई दिले आहे.  
 
- एका न्यूज एजेंसीच्या रिपोर्टानुसार सेरेना विलियम्सच्या मीडिया रिप्रेजेंटेटिवने या गोष्टीची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले की मला ही माहिती देण्यात फारच आनंद होत आहे की सेरेना आई बनणार आहे.  
- सेरेनाने हा फोटो स्नैपचैटवर पोस्ट केला आहे. या फोटोत ती एका मिरर समोर उभी आहे. तिच्या हातात मोबाइल आहे आणि यलो कलरचा स्विम सूट घातला आहे. खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे - '20 आठवडे.'
- सांगायचे म्हणजे की तिने काही दिवसांअगोदर रेड्डिटचे को-फाउंडर एलेक्सिस ओहानियनशी साखरपुडा केला होता. ही माहितीपण तिने सोशल मीडियाच्या माध्यमाने दिली होती.  
 
सेरेनाने पोस्ट केली डिलीट
- सेरेनाने नंतर आपल्या पोस्टाला डिलीट केले आहे. या बातमीमुळे हैराण तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लोक या गोष्टीवर चर्चा करत आहे की ती मजाक तर नाही करत आहे.  
186 आठवड्यापर्यंत जगातील नंबर वन प्लेयर राहण्याचा रिकॉर्ड
- या वर्षी सेरेनाने विम्‍बंलडनमध्ये आपल्या करियरचा 71वा सिंगल्‍स किताब जिंकला आहे. यामध्ये 22 ग्राँड स्लॅम सिंगल्‍स किताब  तिच्या नावावर आहे. या रिकॉर्डसोबतच तिनं टेनिस प्लेयर स्‍टेफी ग्राफची बरोबरी केली आहे.