बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: युहान (चीन) , गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:15 IST)

सिंधू विजयी; सायनाचा पराभव

आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने विजयी सलामी दिली असली तरी सायना नेहवालला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. पुरुष गटात अजय जयरामनेही दुसरी फेरी गाठली असून इतर भारतीय खेळाडू मात्र पहिल्याच फेरीत हजेरी लावून परतले. सिंधूने इंडोनेशियाच्या दिनार आयुस्टीयनचा अवघ्या 31 मिनिटांत 21-8 आणि 21-18 असा फडशा पाडला.  सायनाने जपानच्या सायाका सातोविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही हार पत्करली. एक तास रंगलेल्या या लढतीत जपानी खेळाडूने सायनाला 19-21, 21-16 आणि 21-18 असा घरचा रस्ता दाखवला. पुरुष गटात अजय जयरामने दुसर्‍या फेरीत प्रवेश करताना पाचव्या मानांकित चीनच्या हुवाई टीयानवर 21-18, 18-21 आणि 21-19 असा थरारक विजय मिळवला.