रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2024 (11:44 IST)

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

भारतीय प्रसिद्ध फुटबॉलर सुनील छेत्री यांनी इंटरनॅशनल फुटबॉलमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या 20 वर्ष फूटबॉल करियरला सुनील यांनी पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. सुनील आता शेवटचा सामान फीफा विश्व कप क्वालीफिकेशन मॅच 6 जूनला कुवैतच्या विरुद्ध खेळणार आहे.  भारतीय टीमचे कॅप्टन सुनील छेत्रीने आपली संन्यासाची घोषणा केली आहे. 
 
सुनील छेत्री म्हणाले की, मी आपल्या देशासाठी पहिली मॅच खेळलो होतो तो माझ्या आयुष्यातील खास क्षण होता. ज्याला मी कधीच विसणार नाही. आपल्या शेवटच्या मॅच ला घेऊन सुनील छेत्री म्हणाले की, मागील 19 वर्षांपासून मी देशासाठी अनेक मॅच खेळलो. मी माझे कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पडलेत. तसेच मला भरपूर प्रेम मिळाले. आता कुवैत विरुद्ध माझी शेवटची मॅच राहील. सुनील छेत्री यांनी भारतासाठी 145 मॅच खेळले. ज्यामध्ये त्यांचे नावावर 90 गोल नोंद आहे. सुनील छेत्री यांनी संन्यासाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सोशल मीडियावर आले आहे ते भावनिक झालेत.